न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि २० फेब्रुवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
सविस्तर वृत्त असे की, कोटमगाव माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जय जिजाऊ जय शिवराय अश्या गर्जना देत आदर्श युवक मंडळ चिचोंडी,खुर्द ता येवला संचलित माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून श्री केशवराव यशवंतराव जाधव( शिवसेना ता.गट समन्वयक व ग्रा. पं सदस्य टाकळी ) हे होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता पूजन तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संस्थापक अध्यक्ष माणिकराव मढवई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते ,शिवसेना ता.गट समन्वयक व ग्रा. पं सदस्य टाकळी येथील सन्मानिय श्री. केशवराव यशवंतराव जाधव शाळेला व्यासपीठ बांधून देणार असल्याने त्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक विलासराव सोमवंशी दादा, संस्थेचे सचिव प्रतिक माणिकराव मढवई गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब गांगुर्डे रामनाथ गायकवाड, प्रमोद पवार, रामदास सुरासे, नंदू चव्हाणके, संदीप साप्ते, अशोक शिरसाठ,जितेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शाळेच्या विद्यार्थिनी श्रावणी गायकवाड, कार्तिकी बंद्रे, समीक्षा बोऱ्हाडे या विद्यार्थिनीनी शिवराय यांचा जीवनावर मनोगत व्यक्त केले.
मा. केशवराव जाधव यांनी २६ जानेवारी रोजी श्रावणी गायकवाड हिने भाषण केले होते तर तिचे वक्तृत्व बघून तिला रेंजर सायकल देऊन प्रोत्साहन दिले.

शाळेचा विद्यार्थी प्रज्वल साप्ते व कृष्णा रायते यांनी जिजाऊ माता यांचा पोवाडा सुरेल आवाजात गायला.त्यांना साथ चव्हाणके बंधूंनी दिली.पाहुण्यांच्या स्वागतासाठी इ.१०वी. चा विद्यार्थी कु.सार्थक गुरगुडे याने आपल्या शेतातील गुलाब फुल व पुष्पगुच्छ आवर्जून आणले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गलांडे ए.पी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठीश्री.गलांडे ए .पी श्री केदारे एम टी, श्री गांगुर्डे पी. के, श्री कदम जे .जी, श्री दिवटे बी. एस , देवढे डी. एल यांनी परिश्रम घेतले.
मुख्याध्यापिका अनिता मढवई यांनी सर्वांचे आभार मानले.
मुख्याध्यापिका अनिता मढवई यांनी सर्वांचे आभार मानले.


