विंचूर लासलगाव रोडवर विंचूर नजिक ट्रक द्राक्ष बागेत घुसून काढणीस आलेली बाग भुईसपाट शेतकरी हवालदिल
संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर........

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र
विंचूर दि २५ मार्च विशेष प्रतिनिधी राहुल गलांडे
लासलगाव विंचूर रस्त्यावरील अपघातांचे सत्र सुरूच विंचूर : आज दिनांक 25/03/ 2025 दुपारी दीडच्या सुमारास लासलगाव कडून विंचूर कडे जाणाऱ्या सोळा टायर असलेला ट्रक क्रमांक एम एच 15-jw -6044 या लासलगाव कडून विंचूर कडे येणारा ट्रक हा जनार्दन स्वामी आश्रम विंचूर च्या समोरील द्राक्ष बागेत भरधाव वेगाने घुसला गाडीचा वेग इतका होता की गाडी रोडवरून खाली उतरून द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल तार या सर्व गोष्टींना धडकवात व भुईसपाट करत साधारण 100 ते 125 फूट आत मध्ये घुसला व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला क्षणात होत्याचे नव्हते झाले.
https://youtu.be/DTPASYP-5mo?si=FN0vgnqOoQwe9uEc
सदर द्राक्ष बाग हा संजय नंदूकांत शेवाळे यांचा असून द्राक्ष हा तोडणीस आलेला होता द्राक्ष हे साधारण दहा ते बारा वर्षाची पीक असून या बागेस आता कुठे चार वर्षे पूर्ण झाले त्यामुळे सुरुवातीच्या काळात नुकसान झाल्याने संजय शेवाळे यांचे खूप मोठे नुकसान झाले आत्ताचे नुकसान बघता दहा ते पंधरा लाखाचे आहे.
पुढील दहा वर्षाचा विचार केल्यास काही लाखन लाखात हे नुकसान जाते असे परिसरातील शेतकरी प्रतिनिधी शी चर्चा करताना सांगतात सदर बागेचा व्यवहार हा द्राक्ष व्यापारी सोबत झाला आहे.
दोन दिवसात द्राक्ष बघ हा व्यापारी घेऊन जाणार होता अशात ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला तरी शेवाळे यांनी आपले नुकसान भरून मिळाव अशी मागणी परिसरातील शेतकरी व द्राक्ष बाग मालक करत आहेत.
सदर ट्रक हा लासलगाव येथील रघुवीर भेळ भत्ता सेंटर श्री शरद संतोष निकम यांचा असून ड्रायव्हरला गाडीवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे हा अपघात घडला असे प्रथम दर्शनी नागरिक सांगत आहे.
सदर अपघातात दोन मोटरसायकल स्वारी बचावले स्वार ही बचावले परत एकदा लासलगाव विंचूर या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे.
अशी नागरिक मागणी करत आहे.