निफाड तालुक्यातील भरवस येथील हजारो भाविक;कार्यक्रमाला यात्रेचे स्वरूप
श्री कृष्ण लीला' संगीतमय भागवत कथेस प्रारंभ..
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०९ एप्रिल: विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर

_निफाड तालुक्यातील छत्रपती संभाजी महामार्गावरील भरवस येथे महानुभाव पंथाच्या श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम येथे सात दिवशीय भागवत कथेला आज मोठ्या दिमाखात सुरुवात झाली._

_मयंकराज बाबा पंजाबी, भरवस यांच्या मार्गदर्शनाखाली, महंत चिरडे बाबा यांचे सात दिवशी संगीतमय श्रीकृष्णाच्या लीलावर भागवत कथा होणार आहे._
_सायंकाळी साधारण ७:०० वाजता श्रीकृष्ण पूजा, महाआरती, विडा अवसर करून महंत चिरडे बाबा यांचे रोषणाईच्या रथांमधून भागवत कथेच्या व्यासपीठापर्यंत आदराने आणून, नंतर ध्वज पूजा महंत, तपस्वी, योगी, साधूजन सोबत ब्राह्मणवाडा येथील बाळासाहेब मेहकर कर, लासलगाव येथील एपीआय भास्कर शिंदे आणि भाविक जनसमुदाय यांनी पूजा करून, या कार्यक्रमाच्या भव्य मंडपस्थानाचे मान्यवर व महंत यांच्या हस्ते फीत कापून,श्रीकृष्ण भागवत कथेला सुरुवात झाली._
_भागवत कथे नंतर हजारो भाविक व श्रोत्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला._