नाशिक खंडणीतील गुन्ह्यातील अजून सुद्धा आरोपी फरार
न्यायभूमी
नाशिक दि.०४ जून रोशन गव्हाणे
नाशिक: खंडणीतील गुन्ह्यातील अजून सुद्धा आरोपी फरार आहे,16 दिवस उलटुन सुध्दा पोलिसांना आरोपी सापडत नाही,माजी नगरसेवक नया खैरे व निलेश आहेर यांच्या विरोधात खंडांचा गुन्हा दाखल झालेला आहेत.
बेकायदेशीर प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप,मखमलाबाद परिसरात असलेल्या प्लॉटवर बेकायदेशीपणे कब्जा करून मोटर सायकल आणून शिवीगाळ करीत दमदाटी केली असून तसेच प्लॉट खाली करून दे नाहीतर त्या मोबदल्यात 90 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक – विनायक खैरे व त्याचा साथीदार निलेश मधुकर आहेर यांचे विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठरोड- मसरूळ लिंक रोड परिसरात मौजे मखमलाबाद शिवरातील प्लॉट हडप करून तो रिकामा करण्यासाठी फिर्यादी अतुल प्रभाकर आहेर यांना संशयित खैरे व त्यांच्या साथीदाराने खंडणीसाठी धमकवले आहे.
अतुल अहिरे यांच्या मालकीचा सर्वे क्रमांक 19/1/अ क्रमांक चा प्लॉट आहे,या प्लॉटवर 2019 पासून विनायक खैरे यांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे,अतुल आहेर यांचे छोटेसे किराणा दुकान आहे.
त्यांच्या कुटुंबाला सुद्धा जिवंत मारण्याची धमकी देत दोन्ही आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे.



