परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.२० जानेवारी
साळसाने तालुका चांदवड येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिकत असलेल्या 75 विद्यार्थ्यांना माय स्पोकन इंग्लिश बुक पुस्तक व इतर वाचन लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रताप ठाकरे होते.प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व फॉउंडेशनचे मार्गदर्शक अनंता सावंत,राजेंद्र जाधव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व श्री संत परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
समीर देवडे यांनी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनने आजवर केलेल्या विविध सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक,कार्यक्रमांची माहिती सांगितली.
फॉउंडेशन मार्फत आजवर सलग दोन वर्ष माणुसकिची भिंत उपक्रम,पक्ष्यांना दाना, पाण्याची सोय व्हावी म्हणून बर्ड फिडर लावणे, गंभीर आजारी रुग्णांना आर्थिक मदत करणे, विद्यार्थी व पालक यांना उधबोधनपर प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान,विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्य वाटप,ऊसतोड व इतर स्थलांतरीत मजुरांना सतरंजी व ब्लॅंकेट वाटप,आरोग्य शिबीर इत्यादी उपक्रम राबविले आहे.
प्रमुख अतिथी भास्कर शिंदे व फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर स्वप्नील जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शक्तीदादा महाजन यांनी केले.
या प्रसंगी फॉउंडेशनचे सर्व विश्वस्त,स्वयंसेवक तसेच शाळेचे मुख्याध्यापक बाळू महाले,शिक्षक महेंद्र पवार,पत्रकार शरद लोहकरे यांच्या सह प्रकाश कोल्हे,दशरथ पायमोडे,हनुमान ठाकरे,
शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शांताराम ठाकरे,सरपंच अनिल ठाकरे,पालक नितीन शिंदे, मंगेश ठाकरे,अनिल शिंदे,महेश ठाकरे,अनिल काळे,अंगणवाडी सेविका प्रमिला ठाकरे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



