महाराष्ट्र
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ आणि नामांकित विधिज्ञ ॲड.जयंत दत्तात्रय जायभावे यांची निवड
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
1
3
7
1
9
4
न्यायभूमी
नाशिक दिनांक २० सप्टेंबर
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ आणि नामांकित विधिज्ञ ॲड. जयंत दत्तात्रय जायभावे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! करण्यात आले.
कायदे क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, वकिलांच्या हक्कांसाठी अविरत दिलेले योगदान आणि त्यांचे अष्टपैलू नेतृत्व यामुळेच त्यांना पुन्हा हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे नाशिकच्या विधी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वकील परिषदेवर सलग मिळालेला हा विश्वास आणि विधी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव न्यायव्यवस्थेला अधिक बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास आहे.
महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिशन, नाशिक जिल्हा, अध्यक्ष- ॲड. एस यु सय्यद यांचे वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
1
3
7
1
9
4



