लासलगावचे रेल्वे गेट १०५ दुरुस्तीसाठी बंद; वाहतूक वळविण्याची शक्यता!
२२ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान रेल्वे गेट बंद ठेवण्याबाबत मध्य रेल्वेची सार्वजनिक सूचना

न्यायभूमी
लासलगाव दिनांक २१ ऑक्टोंबर
लासलगाव मध्य रेल्वेच्या मनमाड येथील वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर (कार्य) कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, लासलगाव परिसरातील रेल्वे गेट क्रमांक १०५, कि.मी. २३५/२२-२४ येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
या कामासाठी दि. २२ ऑक्टोबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित रेल्वे गेट रेल्वे येण्या-जाण्यासाठी तसेच रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या या सूचनेच्या प्रती वरिष्ठ मंडळ अभियंता, वरिष्ठ सहाय्यक अभियंता, लासलगाव स्टेशन प्रबंधक कार्यालय, रेल्वे सुरक्षा बल, सरपंच तसेच लासलगाव पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी व वाहनचालकांनी घ्यावी खबरदारी!
रेल्वे गेट बंद असल्यामुळे संबंधित मार्गावरील प्रवासाचे नियोजन करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी.
पर्यायी मार्गाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यास त्यानुसार प्रवास करावा, जेणेकरून अनावश्यक विलंब आणि गैरसोय टाळता येईल.




