Breaking
महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात अवैध गांजा लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस

टोमॅटो-अंबाडीच्या पिकाआड काळा धंदा; ९८० किलो गांजासदृश झाडे जप्त!

1 4 1 6 2 0

न्यायभूमी 

नाशिक |दिनांक २३ नोव्हेंबर विशेष वृत्त

नाशिक जिल्ह्यात अवैध गांजा लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. गिरणारे परिसरातील नाईकवाडी शिवारात टोमॅटो आणि अंबाडीच्या पिकाआड सुरू असलेल्या गांजाच्या संशयित लागवडीवर नाशिक तालुका पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत सुमारे ९८० किलो गांजासदृश हिरवी झाडे, पाने व फांद्या जप्त करण्यात आल्याचे वृत्त असून, त्यांची अंदाजे किंमत १ कोटी ४७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत गट क्रमांक १४५ मधील सुमारे ३० आर क्षेत्रावरील लागवड आढळून आली.

दुर्गम डोंगराळ भागात इतर पिकांच्या आड ही लागवड करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी वामन संतू गुंबाडे याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. गांजाची लागवड करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, बियाणे कोठून आणले आणि तयार मालाची विक्री कोणाला होणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

जिल्ह्यातील इतर भागांतही तपास होणार का?

 

नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांत अशा प्रकारची अवैध लागवड सुरू आहे का, याची व्यापक तपासणी होणे गरजेचे आहे. केवळ लागवडीवर कारवाई न करता या व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा बसणार का? नाशिक पोलिसांच्या पुढील तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 1 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे