Breaking
महाराष्ट्र

ब्राह्मणगाव विंचूर येथे तुळशी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ व युवक मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम; गावात धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन

1 4 1 4 4 2

न्यायभूमी 

कोटमगाव रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ ज्ञानेश्वर भवर

कार्तिक शुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ब्राह्मणगाव विंचूर येथे पारंपरिक तुळशी विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ व युवक मित्र मंडळ, ब्राह्मणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधी, मंत्रोच्चार, भजन आणि फुलांची आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून धार्मिक परंपरेचे जतन केले.

तुळशी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गावातील आबालवृद्ध नागरिक एकत्र येत असल्याने सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि गावातील सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष ठरला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रविंद्र महाले, निलेश गवळी, राजाराम गायकवाड, संपत जाधव, पंडित जाधव, प्रकाश सोनवणे, विठ्ठल सोनवणे, बाळू बैरागी, भाऊसाहेब सोनवणे, कैलास जाधव तसेच समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 1 4 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे