प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने निफाड येथे रास्ता रोको आंदोलन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २४ जुलै अभय पाटील
निफाड दिव्यांग व विधवा महिलांना रू.6000/- मानधन मिळावे,शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला एमएसपी (हमीभाव) वर 20% अनुदान दयावे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावुन किमान रू.5 लक्ष अनुदान घरकुल लाभार्थ्यांना दयावे , दुधातील भेसळ रोखण्यात यावी व गायीच्या दुधासाठी बेस रेट रू.50/- प्रति. लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू.60/- प्रति लिटर मिळावा. कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यंत बंदीचा निर्णय करू नये। सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रू. दर 1% रिकव्हरी बेस रेट मिळावा.
तसेच पुढील 11% रिकव्हरीसाठी 430/- रू. एफआरपी दर मिळावेत या व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार गुरुवारी निफाड तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने निफाड येथील शांतीनगर त्रिफुली येथे रास्ता रोको करण्यात आला.
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजेत या व इतर घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या आंदोलनात प्रहार संघटनेचे निफाड तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ, ज्ञानेश्वर आढाव, विलास भालेराव, राजाराम सोनवणे, नवनाथ घोटेकर, अरुण जाधव सर, जयेश जगताप, आकाश धुमाळ,दीपक शिंदे,कृष्णा कांबळे, सुनील गोराडे,संजय सदाफळ,सुनील ठोंबरे,रामा सैन्द्रे,फकीरा सूर्यवंशी,अंबादास गायकवाड,मंगेश केदार,राजाराम काळे,रोशन तिडके,भगवान राऊत आदींसह कार्यकर्ते सामील झाले होते.
याप्रसंगी निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



