न्यायभूमी न्यूज
विंचूर -दि ३१ ऑगस्ट
आंदोलन कर्त्यांच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यावर सोपविण्यात आली असून, त्यानुसार शनिवारी (ता.३०) येवला-लासलगाव मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा बांधवानी घराघरातून भाकरी,चपाती,मिरचीचा ठेचा,भत्त्याची पाकिटे,बिस्किट पुडे,तांदळाचे कट्टे,काकड्या,मिरच्या,पाण्याच्या बाटल्या सकाळी नऊला विंचूर येथे जमा केल्या.हे सर्व साहित्य चार पिकअप गाड्यांमधून थेट मुंबईकडे रवाना करण्यात आले.
मुंबईतील उपोषणकर्त्यांसाठी शिधा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घरात समाज बांधवांनी गव्हाचे पीठ देण्यात आले.
पिठापासून चपात्या करून देण्याची जबाबदारी महिलांनी स्वीकारली आहे.
‘एक भाकरी समाजासाठी’ या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमातून मराठा समाजाची एकजूट व परस्परांवरील आपुलकी प्रकर्षाने दिसून आली.

आंदोलनाला गेलेले बांधव उपाशीपोटी राहू नयेत.
यासाठी महिलांनी “दररोज भाजी-भाकरी पाठवू, पण आपल्या बांधवांना उपाशी ठेवणार नाही” असा निर्धार व्यक्त केला आहे.



