कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान पत्नीचा खून
न्यायभूमी न्यूज सपादकिय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोपरगाव दि २३ ऑगस्ट
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान पत्नीचा खून करून पतीने नंतर पंख्याला लटकून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे
गावातील रहिवासी दिलीप मुजगुले ही चहाचा व्यवसाय तसेच पत्नी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. सदर पती-पत्नीमध्ये कायम खटके उडत असत. दोन दिवसापासून कुटुंब कलह चालू होता.
दिलिप कायम दारूचे नशेत राहत असल्यामुळे गुरुवारी रात्री दिलीप मुजगुले यांनी त्यांची पत्नी स्वाती मुजगुलेस मारहाण करून ठार मारले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
घरातील भिंतीवर खडूने काही लिहिलेले अढळून आले आहे.स्वाती मुजगुले यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून तालुक्यात पुरस्कार मिळाला होता.अत्यंत मनमिळाऊ असलेल्या स्वाती मुजगुले यांचा आपल्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळे बळी गेला.
आज सकाळी मुजगुले दांपत्याचा दरवाजा उघडा नसल्यामुळे आसपासच्या लोकांनी आवाज देऊन बोलवण्याचा प्रयत्न केला. आतून प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली.
त्यांनी खिडकीतून डोकावले असता दिलीप मुजगुले यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केलेल्या अवस्थेत व स्वाती मुजगुले जखमी मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. दरवाजा तोडून उघडला असता दोघेही मृत अवस्थेत दिसले. त्यामुळे शेजाऱ्यांच्याच्या पायाखालची वाळू सरकली.
दरम्यान शिर्डीचे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संदीप कोळी व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ भेट देत पाहणी केली असता दोघे मृत अवस्थेत होते यामुळे चासनळी गावात खळबळ खळबळ आहे.
भिंतीवर मजकूर खडूने लिहिल्यामुळे शेजारील कुटुंबाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.स्वाती मुजगुले ह्या अंगणवाडी सेविका असल्यामुळे महिलांची अफाट गर्दी झाली होती.
अनेक महिला त्यांच्या आठवणी सांगताना भावुक होऊन डोळ्यातून अश्रू वाहत होते.स्वाती मुजगुले ह्या अत्यंत सेवाभावी व अंगणवाडीतील मुलांवर प्रेम करणाऱ्या म्हणून त्यांची ओळख होती.
परंतु नवऱ्याच्या डोक्यात संशयाची भूत घुसल्यामुळे दारूच्या नशेत त्यांचा बळी गेला.