ॲट्रॉसिटी प्रकरणाला वेगळे वळण मरळगोई खु.येथील तक्रारदारावर परस्पर विरोधी,दंगा,दमबाजीचा गुन्हा दाखल
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
दि १३ जानेवारी :-
मरळगोई खु.येथील ॲट्रॉसिटी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून प्रसाद फाफाळे यांनी तक्रारदारांवर परस्पर विरोधी दंगा, दमबाजीचा गुन्हा दाखल केला आहे.
मरळगोई खु.येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून आदिवासी नागरिकांना मारहाण, शिवीगाळ, विनयभंग प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी, फिर्यादी प्रसाद अंबादास फापाळे, वय- ३० वर्ष, रा. मरळगोई खु.यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत,
तक्रारदार व आरोपी हे एकाच गावात राहणारे असुन एकमेकांचे ओळखीचे आहेत. शुक्र.दि.१० जाने.रोजी ७.३० वा.चे सुमारास गावातील मारूती मंदीराजवळ आरोपी समाधान विठ्ठल गुठुळे यांनी त्यांचे ताब्यातील इर्टीगा गाडी क्रं.एम.एच.१४ एल.बी ७८२९ ही भरधाव वेगाने चालवुन फिर्यादी व साक्षीदार यांना कट मारुन निघुन जात असतांना फिर्यादी यांनी गाडी हळु चालविण्याबाबत सांगितले असता, आरोपी समाधान विठ्ठल गुठुळे याने, ‘ही गाडी समाधान गुठुळेची आहे.
माझी गाडी अडविण्याची कुणाची हिम्मत आहे?’ असे म्हणुन फिर्यादी व साक्षीदार यांना वाईट, साईट शिवीगाळ करून, ‘तुम्ही मागील केस मध्ये देखील पूढाकार घेतला होता.
आता तुम्हाला दाखवितो’ असे म्हणुन त्याने आरोपी विठ्ठल कारभारी गुठुळे, गुठुळे, गुठुळे, केदा संजय गुठुळे सर्व रा. मरळगोई खु. यांना फोन करुन सदर ठिकाणी बोलावुन घेतल्याने ते सर्व तेथे आले.

त्यांचे सोबत गाडीतील इतर दोन अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादी व साक्षीदार यांना, फिर्यादी यांनी गाडी हळु चालविण्यास सांगितल्याचा राग येवुन वाईट साईट शिवीगाळ करून, ‘तुम्ही आता मागील केस मध्ये माघार घेतली आहे, आता तुमच्याकडुन काही होणार नाही.
आता आम्ही तुम्हाला दाखवितो’ असा दम दिला असे म्हटले आहे. त्यामुळे आरोपींच्या विरोधात गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा केला म्हणून त्यांचे विरोधात गु.रजि.न.१४/२०२५, भा.न्या. संहिता २०२३ चे दंगा कलम-२८१,१८९(२),१९१(२) १९०,३५२, ३५१(२),३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली
पो.हवा.नवनाथ नाईकवाडे अधिक तपास करीत आहेत.