0
8
9
9
8
8
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २५ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
राज्यातील अनधिकृत जाहिराती फलक, होर्डिंग, पोस्टर्सबाबत उच्च न्यायालयाने नुकतेच कारवाई करण्याचे आदेश दिल्याने विंचूर ग्रामपालिका ॲक्शन मोडवर आली आहे.
ग्रामपालिकेने शनिवार पासून ते २७ जानेवारी दरम्यान अनधिकृत लावलेले फलक काढणे व कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
विंचूर तीनपाटी भागात दोन बस स्थानक आहे. परंतु दोन्ही बस स्थानकावर मोठमोठाले अनधिकृत फलक लावलेले असायचे त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात जाण्या येण्यासाठी जागा राहत नव्हती.
प्रवासी बस स्थानकात बसले तर लावलेल्या फलकांमुळे गाडी आली की नाही दिसून येत नव्हते.
त्यामुळे बसस्थानक असूनही प्रवाशांना उन असो पाऊस रस्त्यावरच ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती.
0
8
9
9
8
8



