घोटी केंद्रावरील एच.एस.सी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
सिन्नर दि.०९ फेब्रुवारी ( सोमनाथ गिरी )
घोटी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटी ता – इगतपुरी जि.नाशिक या विद्यालयात एच.एस.सी.परीक्षेसाठीची केंद्र आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी केंद्र क्रमांक ३२१ असून दि.१० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ५८७ विद्यार्थी प्रविष्ट आहे.
जनता विद्यालयात बैठक क्रमांक – S -११८६९७ ते S १६२९५५ पर्यंत अशी एकूण ४५० विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सर्व विषयासाठी करण्यात आली आहे.या केंद्रात जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी,न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली,आदर्श कन्या विद्यालय घोटी,उच्च माध्यमिक विद्यालय गोंदे तसेच वाघेरे येथील उच्च माध्यमिक विद्यालय या शाळा समाविष्ट आहे.
तसेच उपकेंद्र आदर्श कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी या उपकेंद्रात आसन क्रमांक S -१६२९५६ ते १७१४४७ S पर्यन्त अशी १३७ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केलेली आहे
अशी माहिती जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटीचे उपमुख्याध्यापक व केंद्र क्रमांक ० ३२१ चे केंद्रसंचालक उल्हास पवार यांनी दिली आहे.
संबंधित संलग्न शाळेतील परीक्षार्थींचा समावेश या केंद्रात आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी १० वाजताप रीक्षा केंद्रात हजर रहावे.सोबत फक्त लेखन साहित्य व पाणी बॉटल आणावे.
सोबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटीचे प्राचार्य नितीन भामरे,केंद्र संचालक उल्हास पवार यांनी केले आहे.



