बार्टी व रुंज गावच्या यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जागतिक पर्यावरण दिन साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
हिंगोली जिल्हा दि ०६ जून विशेष प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे,समतादूत मिलिंद आळणे,गुरुनाथ गाडेकर,संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations) १९७२ पासून दरवर्षी या दिवशी पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा करते.
संयुक्त राष्ट्रांचे आवाहन:
संयुक्त राष्ट्रांनी यंदा सर्व देशांना पर्यावरण रक्षणासाठी सतत कृतीशील राहण्याचे आवाहन केले आहे.
पर्यावरणाच्या रक्षणाशिवाय मानव जातीचे भविष्य सुरक्षित होऊ शकत नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.
आपण खातो ते अन्न,श्वास घेतो ती हवा,पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो.
या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्धव माखणे पाटील ,सामाजिक कार्यकर्ते विश्वराज माखणे पाटील ,सुदाम फुलझळके (सरपंच) यावेळी श्रीराम वडे सर (तालुका अध्यक्ष धनगर समाज असंघटित जाती जमाती) वृक्षलागवड चिंच,आबा,लिंब,वड,पर्यावरण पूरक वृक्ष लावणार आली.
यावेळी केशव फुलझाके,देविदास बेळगे, तुकाराम बैकरे, माजी सरपंच मारुती देवरे, बालाजी खराटे (नर्सरी),सतीश देवेंद् रामा डाके विकी कदम ऋषिकेश काळे,केशवराव फुलझळके बाबाला माखणे ईश्वर डोके गोविंद बिस्मिले अशोक डोके प्रविण डोके मोतीराम भिसे गावकरांनी वृक्ष जतन करण्याची जिम्मेदारी घेतली.



