Breaking
महाराष्ट्र

सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा काँग्रेस नेते सचिन होळकर यांची मागणी

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी

लासलगाव दि.१९ मार्च निशिकांत पानसरे 

विकृत आणि भोंदू ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात यांच्या काळया कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात आणि व्यापक प्रमाणात तपास होणे अपेक्षित आहे. 

कॅप्टन खरात हे सामान्य माणसांचे ज्योतिषी नसून अनेक आमदार,मंत्री,नेते यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.

टीव्हीवर सातत्याने महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा ज्योतिषी खरात यांचा पाय धुताना आणि पाद्यपूजन करताना व्हिडिओ प्रसारित होत आहे.

अशा परिस्थितीमध्ये तपास यंत्रणेवर दबाव येऊ नये तसेच महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करताना अडथळा येऊ नये म्हणून रूपाली चाकणकर यांचा शासनाने तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे.

याबाबत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी मेलद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केला आहे.

सरकारने जर यांचे पद काढले नाही तर सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील होळकर यांनी दिला..

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे