Breaking
महाराष्ट्र

लासलगाव बस स्थानकावरील स्वच्छता गृह सुविधेबाबत ग्राहक पंचायतीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर

0 9 7 7 6 1

न्यायभूमी 

लासलगाव दि.१९जून निशिकांत पानसरे 

लासलगाव बस स्थानकावरील स्वच्छता गृह सुविधेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ (निफाड तालुका) संघटनेच्या वतीने लासलगाव बस आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १ जून २०२६ पासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील सुलभ स्वच्छता गृहांचा वापर प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत केला आहे.

या नियमाची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि प्रवाशांची गैरसोय टळावी म्हणून आगारात तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात प्रामुख्याने स्वच्छता गृहाचा वापर पूर्णपणे मोफत असल्याचा स्पष्ट उल्लेख असलेला मोठा माहिती फलक स्वच्छता गृहाच्या बाहेर दर्शनी भागावर लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच स्वच्छता गृहाच्या बाहेरील परिसरात असलेले ठेकेदाराचे काउंटर आणि खुर्च्या तातडीने हटवण्यात याव्यात अशी विनंतीही करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या हितासाठी आगार प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी ग्राहक पंचायतीचे संघटक श्री.किरण जोशी आणि उपाध्यक्ष श्री.वसंत दंडवते यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांना पाठविण्यात आल्या आहेत

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 7 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे