विंचूर प्रशासनचा भोंगळ कारभार शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष..
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : दि.१५ दत्तात्रय दरेकर
_सीसीटीव्ही (सुर्विलांस क्लोज्डफ्फ FF सर्किट टेलिव्हिजन) ही एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे ज्यामध्ये कॅमेरे आणि मॉनिटर चा वापर करून विशिष्ट क्षेत्राची निगराणी करण्यासाठी वापरली जाते या प्रणालीचा मुख्य उद्देश सुरक्षा आणि निगराणी सुनिश्चित करणे आहे._
महाराष्ट्र सरकारच्या निदर्शना नुसार सर्व सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज व इतर सार्वजनिक स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विंचूर शहरातील लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही आडोशाला तर काही दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत आहेत.
शहरात अपघात, वाहतूक कोंडी, चौकाचौकातील युवकांच्या टोळक्याचे प्रमाण वाढत असल्याने, सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी विंचूर शहरातील नागरिकांनी केली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे सुरक्षितेसाठी चा तिसरा डोळा आहे.
ज्यामुळे त्यांची एक प्रकारे सर्वावर दहशत (नजर) असते. गुन्ह्याचा तात्काळ उलगडा होण्यास मदत होते. विंचूर चौफुली,शाळा, ग्रामपालिका रोड या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले होते.
पोलीस खात्याला ही चांगली मदत होत होती. विंचूर शहरात कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित झाल्याने चौकाचौकातील युवकांची टोळकी छेडछाड, मारामारी, चोरी घरफोडी असे गैरप्रकार यांचे प्रमाण कमी झाले होते. या सीसीटीव्ही यंत्रणेत वाहनाचा नंबर प्लेटसह सर्वोच्य दृश्य कॅमेरात टिपले जात असल्याने, पोलिसांचा अप्रत्यक्षरीत्या वचक वाढला होता.
विंचूर चौफुलीवर, तसेच शाळा, कॉलेज, ग्रामपालिका रोड व नाके नाक्यावर बसवण्यात आले आहेत.
त्या ठिकाणी काही गैरप्रकार गर्दी वाहतूक कोंडी झाली असता, विंचूर पोलीसांना त्या बाबीवर लक्ष ठेवता येते होते.
मात्र काही दिवसापासून काही कॅमेरे बंद तर काही कॅमेरे चालू असल्यामुळे पोलीस यंत्रणेनेला लक्ष ठेवण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
विंचूर शहरात अपघात, वाहतूक कोंडी, चौकाचौकातील युवकांचा टोक धरणे, गुंडगिरी यांचे प्रमाण आधीक वाढत असल्याने, सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी विंचूर शहरवासीयांकडून होत आहे.