काॅम्रेड डाॅ.भालचंद्र कांगो सांगवी ता.शिरपूर जि.धुळे येथे आदिवासि आधिकार परिषदेत मार्गदर्शन करताना
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी न्यूज
शिरपुर दि.१९ सप्टेंबर
प्रतिनिधी वसीम खाटीक
आदिवासींना जल जंगल जमिनीचे अधिकार मिळण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे महत्वपूर्ण योगदान ….. सांगवी येथील आदिवासी अधिकार परिषदेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र काँगो यांचे प्रतिपादन,…., दिनांक 16 9 2024 रोजी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे धुळे जिल्हा किसान सभा व धुळे जिल्हा कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉक्टर भालचंद्र कांगो , यांनी परिषदेचे उद्घाटन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले होतें.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य किसान सभा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात आदिवासींना सातबारा उतारा मिळण्यासोबत आदिवासी आयुक्त कार्यालयामार्फत फेटाळण्यात आलेले वन दावे यांचे रिविजन पुन्हा आदिवासी आयुक्त समोरच व्हावे असे मागणी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत कॉम्रेड सीतारामं येचुरी अतुल कुमार अंजान, कॉम्रेड मदन परदेशी, कॉ. सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उद्घाटन पर भाषणात बोलताना डॉक्टर भालचंद्र काँगो यांनी जंगलात राहणारे आदिवासींना त्यांचे परंपरागत हक्क मिळायला पाहिजे यासाठी कम्युनिस्ट पक्षांनी संघर्षाच्या मार्गाने आदिवासींना जल जंगल जमिनीच्या हक्क मिळवून देण्यासाठीचा लढा कायम ठेवून कम्युनिस्ट पक्ष नेहमीच आदिवासींच्या सोबत आसल्याचे सांगून शिरपूर तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारालाच आगामी विधानसभेत निवडून आणण्याचेदेखील आवाहन त्यांनी केले.
शिरपूर तालुक्याचा विधानसभेच्या आमदार जरी आदिवासी निवडून येत असला तरी आदिवासी आमदार असून देखील गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढत नाही.
त्यांचा बोलवता धनी दुसरा असल्याने यावेळेस तालुक्यातून सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या असे आव्हान डॉक्टर भालचंद्र काँगो यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.राजू देसले यांनी शेतकरी शेतमजूर व आदिवासी विरोधी असलेल्या महायुती सरकार ला निवडणुकीत घरी बसवा असे आवाहन करून आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळेस रामचंद पावरा, सतिलाल पावरा, नर्सिंग पावरा, काँ अमृत महाजन , यांनी मनोगत व्यक्त केले परिषदेत हिसाडे येथील माजी सरपंच बुधा मला पावरा, यांनी हीसाडे ग्रामपंचायत सदस्य गुलाब पावरा, अनाज्यापावरा, तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला यावेळेस त्यांचे पक्षातर्फे स्वागत करण्यात आले.
परिषदेत विविध विषयांवर पाच ठराव करण्यात आले प्रमाणपत्र धारक आदिवासींना सातबारा उतारा त्वरित मिळावा, कसत असलेल्या वन जामीन धारकांना त्वरित पिक पाहणी
लावण्यात यावी, जे फॉर्म त्वरित देण्यात यावे, शिरपूर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर त्वरित सुरू करण्यात यावे, हिसाळे येथील गोरगरीब शेतमजूर तरुणांवर दाखल खोट्याअट्रोसिटी चा गुन्हा रद्द करण्यात यावा. वगैरे मागण्यांचे ठराव करण्यात आले.
या परिषदेत काँ. अर्जुनकोळी, कॉम्रेड साहेबराव पाटील, वसंत पाटील, कॉम्रेड ईश्वर पाटील, एडवोकेट काँ संतोष पाटील नाना पाटील, जितेंद्र देवरे , तुळशीराम पाटील. भरत सोनार , एडवोकेट सचिन थोरात, उखा पाटील कावा पावरा , जाड्या पावरा, आशा कार्यकर्ता स्मिता दोरीक, अरुणासूर्यवंशी, मालती इंदावे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट कॉ. संतोष पाटील यांनी केले, प्रदर्शन कॉम्रेड वसंत पाटील यांनी केले,कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
सदरील परिषदेत तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.