न्यायभूमी न्यूज
लासलगाव ( दि.१९ सप्टेंबर) निशिकांत पानसरे
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना डाक विभागातील विविध योजना व विमा यांची माहिती व्हावी.
या उद्देशाने डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले तर प्रमुख व्याख्याते म्हणून चांदवड डाक विभागाचे श्री.अमोल पगार उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ.श्रीराम कंधारे, डॉ.उज्वला शेळके व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शुभांगी आहेर तर प्रास्ताविक कु.तृप्ती डुकरे यांनी आणि आभार कु.आरती नाईकवाडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.