विंचूर लासलगाव महामार्ग अज्ञात वाहनाच्या धडकेत विंचूरचे प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर दरेकर यांचे निधन
न्यायभूमी न्यूज मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज /दत्तात्रय दरेकर दि.१३, विंचूर (नाशिक) : लासलगाव विंचूर रस्त्यावरील अपघाताची सत्र सुरूच या रस्त्याने आतापर्यंत बऱ्याच तरुणांचे घेतले बळी अशाच एका दुर्दैवी अपघातात विंचूर येथील प्रगतीशील शेतकरी सोपान दरेकर यांचे चिरंजीव कै. चंद्रशेखर दरेकर यांचे काल रात्री साधारण साडेसात आठच्या दरम्याने अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने विंचूर व परिसरात आणि मित्र परिवारात शोककळा पसरली.
दिवसेंदिवस लासलगाव -विंचूर मार्गावरील अपघाताचे प्रमाण खूपच वाढत आहे. लासलगाव व विंचूर येथे कांदा मार्केट असल्यामुळे काही व्यापाऱ्यांचे खळे व भूईकाटे हे विंचूर रोडच्या रस्त्यालगत असल्याकारणाने ती रोडवर होणारी ट्रॅक्टरची व ट्रकची प्रचंड गर्दी असते, रस्ता अरुंद असलेले पर्यायी शेतमाल घेऊन आलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात त्यामुळे इतर वाहनांसाठी हा रस्ता अजूनच अरुंद होतो व अशाच अपघात घडतात सदर सदर बाब सार्वजनिक बांधकाम विभाग स्थानिक प्रशासन स्थानिक आमदार व स्थानिक राजकीय नेते यांच्या निदर्शनास आणून देऊनही यावर काही उपाययोजना होत नाहीत त्यात रस्ता दुपदरी असल्याने समोरासमोरुन येणारी वाहने व ओव्हरटेक करणारी वाहने आणि मोठ्या व वाहनधारकांनी नियम धाब्यावर बसवत वाहनांना बसवलेले प्रखर उजेड असलेले सफेद व पिवळे led बल्पच्या लाईट मुळे समोरील वाहनांच्या अंतराचा चालकाला अंदाज येत नसल्याने, ही अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातामुळे काही घरे तर पूर्ण संपली आहे.

तरीही प्रशासन शांत का
सदर चार पदरी रोडचे काम लवकरात -लवकर सुरू करावे अशी संतप्त प्रतिक्रिया लासलगाव विंचूरकरांची होत आहे.


