Breaking
महाराष्ट्र

अध्यात्मातून कौटुंबिक आनंदाकडे’ विषयावर विचारप्रवर्तक मार्गदर्शन

कुटुंबात '३६' ऐवजी समजूतदारपणाचा '६३ चा आकडा' ठेवावा : सनदी अधिकारी डॉ. विजयकुमार फड

1 2 4 1 6 6

न्यायभूमी 

विंचूर दि.०३ ऑक्टोंबर २०२६ सुनील क्षिरसागर
“कुटुंबात वावरताना सदस्यांमध्ये अनेकदा ३६ चा आकडा पाहायला मिळतो; मात्र सुखी संसारासाठी आणि कुटुंबाच्या एकोप्यासाठी ३६ चा आकडा मोडून ‘६३ चा आकडा’ अंगीकारायला हवा. म्हणजेच मतभेद बाजूला ठेवून समजूतदारपणा, संवाद आणि प्रेमाने नाती जपली पाहिजेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी अधिकारी (IAS) डॉ. विजयकुमार फड यांनी केले.


​येथील सामाजिक व वैचारिक जडणघडणीला हातभार लागावा, समाजातील सर्व घटकांचे प्रबोधन व्हावे आणि तरुणांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने आयोजित ‘मातोश्री कै. विमलबाई वासुदेव दुसाने स्मृती व्याख्यानमाले’च्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पुष्प शुक्रवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. निफाड रोडवरील निसर्ग मंगल कार्यालयात दुसाने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ. विजयकुमार फड यांनी ‘अध्यात्मातून कौटुंबिक आनंदाकडे’ या विषयावर उपस्थितांना ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
​मनावरील ओझे उतरवण्यासाठी अध्यात्म आवश्यक व्याख्यानाची सुरुवात करताना डॉ. फड म्हणाले की, अध्यात्म ही कोणतीही कठीण गोष्ट नसून मानवी जीवनाची एक सहजस्थिती आहे.

धावपळीच्या युगात डोक्यावरचे ओझे सहज उतरवता येते, मात्र मनावरचे अदृश्य ओझे उतरवण्यासाठी केवळ अध्यात्माचीच खरी गरज असते. संत साहित्यातील ‘तुझा आहे तुझपाशी’ या उक्तीचा दाखला देत त्यांनी मानवी आनंद भौतिक वस्तूंमध्ये नसून स्वतःच्या अंतर्मनातच दडलेला असल्याचे स्पष्ट केले.

​आयुष्य दिंडीसारखे आनंदाने जगा
वारकरी परंपरेचा संदर्भ देत ते म्हणाले की, दिंडीतील वारकऱ्यांप्रमाणे मानवाने संपूर्ण आयुष्यालाच एक दिंडी मानून प्रत्येक दिवस समाधानाने आणि आनंदाने जगले पाहिजे. गोवर्धन पर्वताचा प्रसंग सांगताना त्यांनी, इतरांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच आनंदी जीवनाची खरी गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले. शेवटी ‘स्वतः आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदी ठेवा’ या जीवनमूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

​या व्याख्यानाला ग्रामस्थ, महिला व युवकांची मोठी उपस्थिती लाभली होती. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी दुसाने मित्र परिवार व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 4 1 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे