Breaking
महाराष्ट्र

विकासाच्या गप्पा,अंत्ययात्रा बैलगाडीतून!”रस्त्याभावी पार्थिवाचा बैलगाडीतून प्रवास

1 1 0 1 1 8

न्यायभूमी 

नाशिक जिल्हा दि.२४ जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये 

निफाड तालुका हा जिल्ह्यातील सधन आणि प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र या तालुक्यातील कसबे सुकेणे गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने विकासाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव काळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला वस्तीवरून गावात आणण्यासाठी वाहन जाऊ शकले नाही.

अखेर नाईलाजाने पार्थिव बैलगाडीतून चिखलातून गावात आणावे लागले.हा प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

         ग्रामस्थांच्या माहितीनुसार,वस्तीकडे जाणारा जुना गोंडेगाव रस्ता महसूल नकाशात अधिकृतपणे अस्तित्वात आहे. मात्र वर्षानुवर्षे या रस्त्यावर अतिक्रमण झाले असून शासनाकडून आवश्यक खडीकरण किंवा मजबुतीकरण करण्यात आलेले नाही.

परिणामी पावसाळ्यात संपूर्ण रस्ता दलदलीत बदलतो आणि तब्बल चार महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतो.

यामुळे केवळ शेतीमालाची वाहतूकच नव्हे, तर आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणे,विद्यार्थ्यांची ये-जा आणि दैनंदिन जीवनही मोठ्या अडचणीत सापडते. मात्र संपतराव काळे यांच्या निधनानंतर घडलेल्या या घटनेने परिस्थितीचे भीषण वास्तव समोर आले.

अंत्ययात्रेसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगातही रस्ता नसल्याने पार्थिवाला बैलगाडीतून आणण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

महसूल नकाशात रस्ता उपलब्ध असतानाही अतिक्रमण हटवून त्याचे साधे खडीकरण देखील करण्यात आलेले नाही.त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात गावकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. संपतराव काळे यांच्या अंत्ययात्रेचा हा वेदनादायी प्रसंग आता तरी प्रशासनाला जाग आणणारा ठरावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून या मार्गाचे खडीकरण करण्यात यावे,जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रस्ता नसल्याने जिवंतपणी त्रास… आणि मृत्यूनंतरही सन्मानाने अंतिम प्रवास करता आला नाही.

कसबे सुकेणेतील हा प्रसंग विकासाच्या दाव्यांना हादरा देणारा असून प्रशासनाने तातडीने दखल घेणे ही काळाची गरज आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे