Breaking
गुन्हेगारी

लासलगाव सर्वे न 93 येथील दिगंबर जैन मंदिरात जबरी चोरी

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 9 0 2 1

न्यायभूमी 

 लासलगाव दि.३० जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी 

 लासलगाव येथील ग्रामपंचायत जवळील क्रिकेट ग्राउंड शेजारी असलेले दिगंबर जैन स्थानक मंदिर मध्ये रात्री दोन वाजेच्या दरम्यान चार ते पाच जणांच्या टोळीने डॉक्टर दरेकर यांच्या घराजवळ असलेल्या दिगंबर जैन मंदिराच्या खिडकीला फोडून आत प्रवेश करून किमान दोन ते अडीच किलोचे चांदीचे टोप व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली चोरांनी आत मध्ये प्रवेश करून अस्तव्यस्त केलेल्या सर्व वस्तू व कपाट फोडून जबरी चोरी केल्याची घटना लासलगाव येथील मध्यवर्ती असलेल्या सर्वे नंबर 93 मधील दिगंबर जैन मंदिरात घडली आहे.

दरम्यान सदरील घटनेची माहिती लासलगाव पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आलेली आहे. लासलगाव पोलिसांनी फिंगर प्रिंट्स च्या टीमला पाचारण करून पुढील तपास वेगाने सुरुवात केली आहे.

लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साळुंखे, गोसावी तपास करत आहे.

दरम्यान क्रिकेट ग्राउंड जवळील जागेत रात्री दहानंतर कोणासही थांबण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी सर्वे न.93नंबर येथील नागरिकांनी केली आहे

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे