Breaking
महाराष्ट्र

वेळापूर ते पिंपळगाव नजिकचा शिवार रस्ता चाळीस वर्षानंतर अखेर वाहतुकीसाठी खुला शेतकऱ्यांचा वनवास संपला

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 5 0 8

न्यायभूमी 

खेडलेझुंगे दि.१७ एप्रिल/ बाबा गिते 

निफाड तालुक्यातील मौजे वेळापूर शिवारातील वेळापूर ते पिंपळगाव नजिक हा शिवार रस्ता गेल्या चाळीस वर्षांपासून बंद होता.

मात्र, महसूल प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकारामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुला करण्यात आला असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

 गेल्या चार दशकांपासून हा रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक व शेतीच्या कामांसाठी मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याअभावी मशागत व पीक बाजारात नेणे अत्यंत जिकिरीचे झाले होते.

याबाबत शेतकऱ्यांनी निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांचेकडे लेखी तक्रार केली होती.शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्येची तहसीलदार नाईकवाडे यांनी गांभीर्याने दखल घेत भूमी अभिलेख कार्यालयास तातडीने रस्त्याची मोजणी करून महसूल कर्मचाऱ्यांना तो रस्ता कायमस्वरूपी खुला करण्याचे आदेश दिले होते.

त्यांचे आदेशाने लासलगाव मंडळ अधिकारी रुपाली सावळे, ग्राम महसूल अधिकारी ईश्वरी देशमुख यांच्या देखरेखीखाली रस्त्याची अधिकृत मोजणी पूर्ण करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पोलिस बंदोबस्तात या रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करून तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला.

यावेळी मा.सरपंच नारायण पालवे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार, पो.हवा नवनाथ नाईकवाडे, ग्रा.पं.अधिकारी नितीन शिरसाठ, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे,वनसेवक जयप्रकाश शिरसाठ, महसूल सेवक जयश्री पवार यांच्यासह ग्रामपंचायत वेळापूर कर्मचारी उपस्थित होते.

 निफाडचे तहसिलदार व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा चाळीस वर्षांपासूनचा ज्वलंत प्रश्न तातडीने मार्गी लावला,त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून शेती कामांना गती मिळणार आहे.

त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाचे माणिक पालवे, राजू पालवे,निलेश पालवे,आबा पालवे,केदु गाडे, नारायण कुटे,शंकर कुटे, भाऊसाहेब घोडे, मधुकर सरोदे,कैलास सरोदे,सागर आढाव, साहेबराव वाकचौरे यांसह वेळापूर आणि पिंपळगाव नजिक क्षेत्रातील शेतकरी व खातेदार खातेदारांनी समाधान व्यक्त केले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे