Breaking
कृषीवार्ता

निफाड तालुक्यातील हनुमान नगर येथे बिबट्याचा थैमान;नागरिक भयभीत..

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

विंचूर (नाशिक) दि ०८ मार्च : सुनील क्षिरसागर 

छत्रपती संभाजीनगर रोडवरील विंचूर पासून जवळच असलेले हनुमान नगर येथे पुनश्च बिबट्याने रात्रीच्या वेळेस भास्कर गुंजाळ यांच्या वस्तीवरील शेळीवर हल्ला केला.

गेल्या महिनाभरापासून हनुमान नगर परिसरात बिबट्या थैमान घालत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झाले आहे.

तर शेतकऱ्यांना लोड शेडिंग मुळे दिवसा लाईट बंद असते आणि रात्री लाईट चालू असते या बिबट्याच्या धुमाकूळ मुळे यांना रात्री पिकांना पाणी भरणे अशक्य झाले आहे.

हनुमान नगर मधली महिनाभरात ही दुसरी घटना घडली आहे. 

प्रतिक्रिया —

हनुमाननगर परिसरामध्ये रात्रीचे चार दिवस वीज पुरवठा असतो तर दिवसाचा तीन दिवस असल्याने शेती पिकांना या दिवसात जास्त पाणी लागत असल्याने वेळेवर शेतीला पाणी देणे शक्य होत नाही.

महावितरणने सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्याच्या भीतीने वावरात जाता येत नाही. त्यामुळे शेतीला रात्रीचे पाणी देणे शक्य नाही आणि पाळीव प्राणी सांभाळणे हे अवघड झाले आहे.

-ज्ञानेश्वर भडांगे.

 हनुमान नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे