कोळगाव निफाड तालुक्यातील येथील लहान मुलांवर बिबट्या चा हल्ला
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
कोळगाव दि.३० डिसेंबर अजिंक्य जगताप

कोळगाव ता निफाड येथील वडील व मुलगा संध्याकाळी 6 च्या दरम्यान शेतातील कामे आटोपून घरा कडे परतत असताना अचानक एका झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्या ने ह्या मोटार सायकल वर उडी घेतली परंतु दैव बलवत्तर म्हणून ह्या बिबट्या ची झाप हुकली परंतु श्री ज्ञानेश्वर घोटेकर हे सावध असल्याने त्यांनी गाडी चा स्पिड वाढवला परंतु मागे बसलेला कु सोहम घोटेकर वय वर्षे आठ ह्यांच्या पायाला ह्या बिबट्या ची नखे ओरबडली असुन सध्या ह्या बालकाला देवगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तरी हा रस्ता जास्त रहदारी चा आहे.
तसेच संध्याकाळी शेतातील कामे आटोपून सर्व शेतकरी ये जा करत असतात परत काही घटना घडन्या अगोदरच येथे पिंजरा बसवून बिबट्या ची दहशत कमी करावी.
अशी मागणी गावकरी वर्ग करीत आहेत सदर घटना वनविभागाने गांभीर्याने घ्यायला हवी.



