जिथे रुग्णसेवा बनली जीवनध्येय तिथे डॉ. विलास कांगणे यांना मिळाला‘धन्वंतरी’चा सन्मान
लासलगाव दि.२८ जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये

न्यायभूमी
रुग्णसेवा हीच जीवनाची खरी साधना मानून वैद्यकीय क्षेत्रात समर्पण,संवेदनशीलता आणि माणुसकीचा आदर्श निर्माण करणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.विलास जगन्नाथ कांगणे यांना लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे प्रतिष्ठेचा ‘धन्वंतरी पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला.
प्रदीर्घ काळाच्या निःस्वार्थ रुग्णसेवेचा हा गौरव सोहळा लासलगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
डॉक्टर दिनानिमित्त भास्करलीला मंगल कार्यालय,लासलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात IMA ऑल इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ.नारायण देवगावकर यांच्या हस्ते डॉ. कांगणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते,तर सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. पार्थ देवगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ दायमा,माजी सभापती सौ.सुवर्णाताई जगताप,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शांतनू पाटील,प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कविता दराडे,महाराष्ट्र अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा,माजी सरपंच अफजल शेख,शिवा सुरसे,सचिन होळकर, योगेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. विलास कांगणे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाचा गौरव केला. रुग्णांशी जपलेले आपुलकीचे नाते, प्रत्येक रुग्णाला दिलेला विश्वास, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील जैन यांनी प्रास्ताविकातून डॉक्टर दिनाचे महत्त्व, वैद्यकीय सेवेमागील समर्पणाची भावना आणि ‘धन्वंतरी पुरस्कार’ या उपक्रमामागील संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. समाजासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. विलास कांगणे यांनी हा सन्मान आपल्या रुग्णांचा, गुरुजनांचा, सहकाऱ्यांचा आणि कुटुंबीयांचा असल्याची भावना व्यक्त केली. “हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. भविष्यातही प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सेवाभावाने रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चांदर यांनी केले. डॉ. अमोल शेजवळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, डॉ. युवराज पाटील यांनी सन्मानपत्राचे प्रभावी वाचन केले,तर डॉ.श्रीकांत आवारे यांनी आभार प्रदर्शन केले.
या सोहळ्यास डॉ. कैलास पाटील, डॉ. विजय बागरेचा, डॉ. सुरेश दरेकर, डॉ. अशोक महाले, डॉ. अनिल बोराडे, डॉ. भरत पाटील, डॉ. प्रताप पवार, डॉ. भाऊसाहेब रायते, डॉ. अमित धांडे, डॉ. रोहित शेळके, डॉ. मृगेश शहा, डॉ. उत्तम रायते, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. प्रकाश गांगुर्डे, डॉ. विनोद लोहाडे, डॉ. सचिन जांगडा, डॉ. विक्रम होळकर, डॉ. भिकचंद जांगडा, डॉ. प्रणव माठा, डॉ. मनीषा पलोड, डॉ. सोनाली रायते, डॉ. विजय केंगे, डॉ. निलेश दळवी, डॉ. मयूर जांगडा, डॉ. रोहित अल्लाट, डॉ. अविनाश पाटील, डॉ. सुशील लाहोटी, डॉ. दत्तात्रय जगताप, डॉ. कुणाल दगडे, डॉ. प्रियंका गायकर यांच्यासह लासलगाव व परिसरातील अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात डॉ.विलास कांगणे यांचा गौरव केला.
रुग्णसेवेला जीवनध्येय मानून कार्य करणाऱ्या एका सेवाभावी डॉक्टरच्या कार्याचा हा सन्मान लासलगावच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.



