लासालगांव येथे एच.डी.एफ.सी बँकेच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम
न्यायभूमी न्यूज लासालगांव प्रतिनिधी निशिकांत पानसरे
न्यायभूमी न्यूज
लासलगांव दि २८ जुलै : लासलगाव परिसरातील व्यापारी वर्गात, खातेदारांसोबत तसेच विविध कर्जवाटपाच्या माध्यमातून सर्व स्तरांतील नागरिकांचे आर्थिक उंचवतांना व्यापारी संबंध दृढ करत असताना,एचडीएफसी बँक विविध जनहितकारी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपत आहे.

या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून एच.डी एफ.सी बँकेच्या वतीने लासलगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी करंज,कडुलिंब,पिंपळ यांसारख्या देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी एचडीएफसी बँकेच्या डब्ल्यूबीओ विभागाचे प्रमुख अमोल शिंदे, श्रुतिका गवळी,कृषी विभागाचे खंडेराव जगताप, अनिकेत आव्हाड उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या या उपक्रमात हरित सेनेचे सदस्य अक्षय ब्रह्मेचा,शंतनू पाटील,शेखरभाऊ शिंदे,निलेश जगताप,सुहास कोल्हे,डॉ.संगीता सुरसे,अर्चना डुंबरे व ऋषीकेश जोशी यांचा सक्रिय सहभाग होता



