Breaking
महाराष्ट्र

गॅस लिक झाल्याने हॉटेलात तर एसीचा स्फोट झाल्याने लॉन्स मध्ये आग सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर दि २२ मार्च विशेष प्रतिनिधी 

शहरात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आगीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी (२१ मार्च) सकाळी ९ वाजेच्या सुमारास बीड बायपास परिसरातील व्हीआयपी मराठा हॉटेलमध्ये तर दुपारी साडे बाराच्या सुमारास गुरु लॉन्समध्ये एसीच्या मशीनचा स्फोट झाल्याने ४ एसी जळाले आहे.

या दोन्ही घटनांमध्ये केवळ वित्तहानी झालेली असून कुठलीही जीवितहानी नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी हरिभाऊ घुगे व दीपराज गंगावणे यांनी दिली. 

सकाळच्या सत्रात हॉटेलमध्ये दिवसभरासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करून भाजी बनवण्यासाठीची तयारी सुरू होती.त्यावेळी गॅस शेगडीच्या ठिकाणी गॅस लिक झाला.

त्याच ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते,त्यामुळे आगीचा भडका उडाला.हॉटेलचे सर्व कर्मचारी त्याच ठिकाणी उपस्थित असल्याने त्यांनी आजूबाजूला असलेले ज्वलनशील पदार्थ बाजूला करत अग्निशमन विभागाला संपर्क केला.

तातडीने घटनास्थळी पोहचून अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी आगीवर नियंत्रण मिळवले.

यानंतर सायंकाळी हॉटेल पूर्ववत झाल्याची माहिती मालक ज्ञानेश्वर गंगावणे यांनी दिली. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास बीड बायपास परिसरातीलच गुरूलॉन्स येथे एसीच्या डक्टला आग लागली. यात चार एसी जळून खाक झाले..

सध्या उन्हाळा सुरू असून प्रचंड उकाडा जाणवत असल्याने एसीचा वापर वाढला आहे. प्राथमिक अंदाजानुसार,वेळोवेळी एसीचे मेंटन्स केले नसल्याने अशा आगीच्या घटना घडतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे