विंचूरच्या रयत संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २४ डिसेंबर संपादक दत्तात्रय दरेकर
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे , पंचायत समिती शिक्षण विभाग निफाड, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि तालुका विज्ञान अध्यापक संघ निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 26 व 27 डिसेंबर 2024 रोजी 52 वे निफाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी , ॲड.भगिरथ शिंदे व्हा.चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा,आमदार दिलीपराव बनकर, निफाड विधानसभा मतदारसंघ, आमदार छगनराव भुजबळ, येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ,आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक यांच्या हस्ते तसेच प्रवीण पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक , डॉ. नितीन बाच्छाव शिक्षणाधिकारी प्राथमिक, किरण गुरव, पोलीस निरीक्षक निफाड, विशाल नाईकवाडे, तहसीलदार निफाड, भास्करराव शिंदे, पोलीस उपनिरिक्षक लासलगाव, सुनील पाटील, गट विकास अधिकारी उच्च श्रेणी निफाड, डॉ. सुजित गुंजाळ जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, सुनील मालपाणी सदस्य, उत्तर विभागीय सल्लागार मंडळ, रयत शिक्षण संस्था, सातारा, सचिन दरेकर, सरपंच विंचूर, कुमार चव्हाण उपसरपंच विंचूर, कैलास सोनवणे, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर नानासाहेब जेऊघाले, वैभव दरेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तसेच विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी, पंढरीनाथ सयाजी दरेकर चेअरमन स्थानिक सल्लागार समिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर, खासदार भास्कर भगरे लोकसभा सदस्य दिंडोरी मतदारसंघ,अनिल कदम माजी आमदार निफाड विधानसभा मतदारसंघ, आमदार किशोर दराडे शिक्षक आमदार नाशिक विभाग, आमदार सत्यजित तांबे पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग, पंढरीनाथ थोरे माजी जि.प. अध्यक्ष,नाशिक तसेच,प्रकाश अहिरे शिक्षणाधिकारी योजना, रवींद्र परदेशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद, निलेश पालवे, विभागीय पोलीस अधिकारी निफाड, हेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी, निफाड, बाळकिसन मालपाणी, गंगाधर जेऊघाले, राजाभाऊ गोरे, सोमनाथ निकम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर विज्ञान प्रदर्शनात निफाड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहेत.
त्यात प्राथमिक गट इयत्ता 1ली ते 5वी, माध्यमिक गट इयत्ता 6 वी ते 8वी, उच्च माध्यमिक गट इयत्ता 9वी ते 12वी, शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक व माध्यमिक,तसेच प्सरयोगशाळा सहाय्यक व परिचर या प्रत्येक गटातून विद्यार्थी व शिक्षक विज्ञान प्रदर्शनात वैज्ञानिक उपकरणे गणितीय उपकरण, व शैक्षणिक साहित्य उपकरणे यांचे प्रदर्शन सादर करणार आहेत
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान उपकरणे व गणित उपकरणे यांच्या माध्यमातून नवनवीन कल्पना प्रदर्शनातून सादर करण्यात येणार आहेत.
गटशिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल, कर्मवीर भाऊराव पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, विज्ञान प्रेमी विद्यार्थी व नागरिकांना विज्ञान प्रदर्शन पाहण्याची आवाहन केले आहे.