लासलगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २३ डिसेंबर
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग +२ स्तर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन आज दि. २३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा, वाकी (खुर्द), ता. चांदवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये संस्काराची जडणघडण होते. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविले जातात असे प्रतिपादन शिबीराचे उदघाटक म्हणून लाभलेले चांदवडचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ.नितीन गांगुर्डे यांनी केले.
लासलगाव महाविद्यालयाच्या वतीने वाकी (खुर्द) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मा.डॉ.भाऊसाहेब रायते होते. त्यांनी जीवनात शिबिराचे महत्व व आपल्या कामातून गावात ठसा उमटविण्याचे आवाहन करून श्रमदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविकातून या शिबिरांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सोमवार दिनांक २३/१२/२०२४ ते रविवार दिनांक २९/१२/२०२४ या कालावधीत जिल्हा परिषद शाळा वाकी (खुर्द), ता.चांदवड, जि.नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे.
या श्रमसंस्कार शिबिरात वृक्षारोपण, युवा संवाद, डिजिटल साक्षरता, बालविवाह समाज प्रबोधन, आरोग्य शिबिर, ग्राम सर्वेक्षण, स्वच्छ भारत अभियान, मतदान जनजागृती, ऊर्जा बचत काळाची गरज, महिला सबलीकरण, शोष खड्डे, रस्ता सुरक्षा अभियान, आरोग्य शिबिर अंतर्गत हिमोग्लोबिन तपासणी असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य मा.हसमुखभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, चांदवडचे माजी पंचायत समिती सदस्य मा.देविदास आहेर आणि श्री.अरुण देवढे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व शिबिरार्थींना देखील याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी रा.से.यो. स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व व्यक्तिमत्वाचा विकास साधावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी केले. तर आभार डॉ.संजय शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. शुभम इंगळे आणि दिपाली वाघ या स्वयंसेवकांनी पसायदान सादर केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मा.श्री.हसमुखभाई पटेल, चांदवडचे माजी पंचायत समिती सदस्य मा.श्री.देविदास आहेर, श्री.अरुण देवढे सर, वाहेगाव (साळ.) चे पोलीस पाटील श्री.दीपक खैरे, श्री.केशव खैरे, लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, डॉ. राजेश शंभरकर, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.राधा खांडगौरे तसेच वाकी (खुर्द) ग्रामपंचायतचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा वाकी खुर्द येथील शिक्षक- शिक्षकेतर वृंद, रा.से.यो. स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा वाकी (खुर्द), ता.चांदवड जि.नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे.