Breaking
महाराष्ट्र

खेरवाडी येथील जलतरण पट्टू संतोष (बालाजी) लगड यांनी सापडलेले मंगळसूत्र परत करून दाखवला प्रामाणिक पणा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

 नाशिक दि २३ डिसेंबर प्रतिनिधी / मीनाताई शेटे

खेरवाडी गावचे जलतरण पट्टू तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष (बालाजी ) लगड यांनी खेरवाडी गावच्या बाजार च लिलाव घेतलेला असुन बाजार मध्ये महसूल गोळा करत असताना भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी गावकरी बाजार करण्यासाठी येत असतात.

 यामध्ये बालाजी यांस एका महिलेचे अंदाजे 40 ते 50 हजार रुपये इतक्या रमकेचे मंगळसूत्र सापडले असुन त्याबद्दल चौकशी करून सदर मंगळसूत्र हे कोणाचे आहे.

त्याबद्दल खात्री करून बाजार चा गोळा करत असलेला महसूल स्वतः थांबवला व ते सापडलेले मंगळसूत्र कोणाचे आहे.

याची खात्री करून मिराबाई शिवराम मोरे या महिलेचे होते मंगळसूत्र त्या महिलेस परत करण्यात आले सदर मिराबाई यांनी बालाजी चे खुप खुप कौतुक करून त्याचे आभार मानले.

प्रामाणिक पणा चे फळ परमेश्वर कुठे तरी देतो यावर विश्वास ठेवत संतोष (बालाजी )लगड यांनी जो प्रामाणिक दाखवला त्याबद्दल खेरवाडी ग्रामपंचायत,वि. वि.कार्यकारी सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने आणि न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग यांच्या वतीने संतोष (बालाजी ) चे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे