Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूरच्या क.भा.पा.विद्यालयात शांतता व एकतेचे प्रतीक असलेला जागतिक अहिंसा दिन मोठ्या उत्साहात साजरा

Nyaybhumi news

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

विंचूर: दि ०३ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर 

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच जागतिक अहिंसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे हे होते.

सदर जयंती कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील इयत्ता दहावी ड च्या विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रम प्रसंगी कावेरी सानप, धनश्री वाडेकर, आनंद उगले, समर्थ गायकवाड, रितू पवार, सिद्धी नवले, उदय गोरडे, अदिती जेऊघाले, निखिल पीठे, श्रद्धा जेऊघाले, निशा जाधव, दुर्गा भडांगे, रोहिणी सानप, अर्चना जाधव, अदिती जाधव, धनश्री वाळेकर,आदी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे राष्ट्रपती लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी तसेच जागतिक शांतता दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

समाजात जर शांतता निर्माण करावयाची असेल तर महात्मा गांधी यांचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे. महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच सत्य आणि अहिंसा यांचे जीवनातील महत्व याविषयी कार्यकमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे, विद्यालयातील उपशिक्षक टिळेकर आर टी, एस डी, पवार एस एम, बागुल एस जे, शिंदे एस व्ही, साळुंके ए एन, निकम एम एस, कोळी पी एल, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक निकम हिने केले, तर मोनिका लांडबले हिने आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे