Breaking
आरोग्य व शिक्षण

लासलगाव महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि ०२ ऑक्टोंबर

              लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज २ ॲाक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त या महापुरूषांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२० व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर व रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते.

      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 

संपूर्ण जगाला प्रेरित केले. महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले. हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री एवढ्या उच्च पदावर असतांनाही त्यांच्यामध्ये सत्य, निर्मळपणा, प्रामाणिकपणा, साहस, साधेपणा, देशप्रेम इत्यादी सद्गुण होते आणि सदाचाराचे ते मूर्तीमंत स्वरूप होते.

अशा दोन्ही थोर महापुरुषांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे