Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लासलगांव ग्रामपंचायतीत तंबाखू मुक्तीची शपथ

घातक पदार्थांपासून सर्वांनी दूर राहण्याचे आवाहन

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

खेडलेझुंगे नासिक जिल्हा दि १६ ऑगस्ट/ बाबा गिते 

ग्रामपंचायत लासलगांव येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने नागरिक,विद्यार्थी व मान्यवरांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

उपस्थितांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच योगिता पाटील,उपसरपंच रामनाथ शेजवळ,ग्रामपंचायत सदस्य जयदत्त होळकर,अमिता ब्रम्हेचा,अफजल शेख,रेवती होळकर,रोहित पाटील,पुष्पा आहिरे,लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भास्करराव शिंदे, गोपनीय शाखेचे सुजय बारगळ, ग्रामपंचायत अधिकारी संजय बावीस्कर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी,पत्रकार,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ज्येष्ठ नागरिक,तसेच जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी व नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग,हृदयरोग, श्वसनाचे आजार,दात व तोंडाचे आजार, व्यसनाधीनता,गर्भवती महिलांमध्ये धोका, आर्थिक नुकसान व अकाली मृत्यू असे अनेक दुष्परिणाम संभवतात.

त्यामुळे अशा घातक पदार्थांपासून सर्वांनी दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

तंबाखू व अंमली पदार्थ मुक्तीची शपथ

मी शपथ घेतो की,मी स्वतः कधीही तंबाखू,गुटखा, बीडी, सिगारेट तसेच कोणतेही अंमली पदार्थ सेवन करणार नाही.

तंबाखू व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन मी आरोग्यदायी जीवन जगण्याचा संकल्प करतो.

मी माझ्या कुटुंबीयांना,मित्रांना व समाजातील लोकांना देखील व्यसनापासून दूर राहण्याचे प्रोत्साहन देईन.

स्वच्छ, निरोगी व व्यसनमुक्त समाजासाठी मी माझा सक्रिय सहभाग नोंदवीन.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे