Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि ०१ मार्च प्रतिनिधी:-

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलीत डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते.

व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक डी.एच. जाधव,अलका काळोगे,मंजुषा पडवळ,विनिता देवरे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राजेंद्र गांगुर्डे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, प्रचार ,प्रसार व कुसुमाग्रज यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली. 

     यावेळी बोलताना रामदास वाजे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात व व्यवहारात मराठी प्रमाण भाषेचा वापर करावा. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.

विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या वतीने मानसी जाधव, सायली आव्हाड,स्वरांजली सहाणे, प्राची चव्हाण, दुर्वा वारुंगसे,प्रणिती कडभाने,गौरी वाजे,रेणुका वारुंगसे, समिक्षा माळी,राजश्री उघडे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयश्री गोहाड यांनी केले.

आभार रेखा खंडीझोड यांनी मानले. यावेळी मारुती डगळे, रेवणनाथ कांगणे, सुनिल ससाणे,डी.ए.रबडे एस.बी.गुरुळे,सुदाम वारूंगसे, सोमनाथ माळी,रवि गोजरे, किशोर शिंदे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने, आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे