Breaking
कृषीवार्ता

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्या ; २०२५ पीक विमा भरपाईत सर्व बाधित मंडळांचा समावेश करा ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

1 1 6 3 7 3

न्यायभूमी 

लासलगाव दि.०५ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये

नियमितपणे शेती कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वितरित करावे.

तसेच सन २०२५ मधील खरीप व रब्बी पीक विमा नुकसान भरपाईच्या कक्षेत नांदुरमधमेश्वर,विंचूरसह तालुक्यातील सर्व बाधित मंडळांचा समावेश करावा,अशी मागणी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

        शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार वेळेवर व नियमित कर्जफेड करणारे अनेक पात्र शेतकरी अद्यापही प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम तातडीने वर्ग करावी.

तसेच सन २०२५ च्या खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल व नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, नांदुर मधमेश्वर, विंचूरसह अनेक बाधित मंडळांचा पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत समावेश झालेला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

त्यामुळे सर्व बाधित मंडळांचे पुनर्निरीक्षण करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळेल, अशा पद्धतीने पीक विमा भरपाई मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

     याप्रसंगी गोकुळ मुरलीधर नागरे, अशोक भाऊसाहेब नागरे, पुरुषोत्तम गणपत नागरे, वाल्मिक देवराम नागरे, भाऊसाहेब पुंजाराम नागरे, विठ्ठल मुरलीधर नागरे, दगू नथू नागरे, संजय किसन कांगणे, योगेश कैलास नागरे, खंडू नागरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

    निवेदनावर सारोळे थडी, खेडले झुंगे, धारणगाव खडक, धारणगाव वीर, नांदुर मधमेश्वर, करंजी, कोळगाव तसेच परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 6 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे