येवला येथे कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन!
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
येवला दिनांक १० नोव्हेंबर पुष्पा पाटील

दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत रांगोळीला विशेष महत्त्व असून, सण-उत्सवांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून कलात्मकता, सर्जनशीलता आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडते. याच कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत येवला परिसरातील महिलांना आपली कलात्मक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी ठेवण्यात आलेली नाही. तसेच रांगोळीच्या आकारावर, विषयावर किंवा जागेवर कोणतेही बंधन नसणार आहे.
स्पर्धकांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून, दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेनंतर परीक्षकांकडून रांगोळ्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेतील आकर्षक पारितोषिके :
– प्रथम क्रमांक – ३००१ रुपये
– द्वितीय क्रमांक – २००१ रुपये
– तृतीय क्रमांक – १००१ रुपये
– चतुर्थ क्रमांक – ५०१ रुपये
स्पर्धेसाठी फ्री हँड (मुक्तहस्त), संस्कार भारती, टिपक्यांची रांगोळी, १४ वर्षांखालील स्पर्धक आणि लाकूड/बोर्ड रांगोळी अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा आणि परिसरात कलात्मक व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण व्हावे, हा फाउंडेशनचा उद्देश आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 8623872350
📞 8983127227
📞 7620122402
कुणाल दराडे फाउंडेशन, येवला यांच्या वतीने परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कलात्मक प्रतिभा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



