Breaking
कृषीवार्ता

हनुमान नगर (विंचूर) – मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात व असल्याने, तलाठी आनंद गोटम ,व कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांचे चिखलात उतरून पंचनामे

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 4

न्यायभूमी 

विंचूर दि ०२ ऑक्टोंबर  दत्तात्रय दरेकर 

हनुमान नगर, विंचूर,विष्णूनगर व परिसरास गेले दोन दिवस मुसळधार पावसाने शेतकरी झोडपले जिकडे तिकडे पाणी यात शेतकरी मोठ्या आस्मानी व आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले असून,शेतकरी हवालदिल आहेत.

काही शेतकऱ्यांच्या मते,या पावसामुळे सोयाबीन,मका,कांदा तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन पूर्णपणे बुडाले आहे.

जीपी के आज उभे दिसतंय परंतु त्यांच्या खाली पाणी आहे त्या पाण्याने मुळे खराब होऊन वस्तुस्थितीत ती खराब झाली काही पाण्यातच आडवी झाली.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत तलाठी आनंद गोटम कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी विंचूर,हनुमान नगर, सुभाष नगर,विष्णुनगर,यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे सुरू केले आहेत.

तलाठी,कृषी अधिकारी हे शेतात चिखलात उतरून पिकांचे नुकसान नोंदवत आहेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांनी आपली चिंता व्यक्त करत आणि त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,पावसामुळे शेतातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि शेतांचे पाणी व्यवस्थित निघत नसल्यामुळे पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

“संपूर्ण शेत बुडाले आहे. सरकारने त्वरित मदत जाहीर करावी,” असे शेतकऱ्यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाचे अधिकारी म्हणतात की, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करून मदत देण्यात येईल.

तसेच,पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आणखी आवश्यक ती मदत आणि उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदर परिस्थितीमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल असून पावसाचे जोरदार स्वरूपात नाले भरलेले असल्याने शेतातील नुकसानाचे प्रमाण मोठे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे