Breaking
कृषीवार्ता

पिकविमा परताव्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक:-काँग्रेस नेते सचिन होळकर यांची टीका

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 7 7 6 1

न्यायभूमी 

 लासलगाव दि.२२ जून निशिकांत पानसरे 

पिकविमा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांच्या पिकाला होणाऱ्या नुकसानी पासून थोड्याफार प्रमाणात संरक्षण मिळते मात्र केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या खोडसाळपणामुळे तसेच पीक विम्याचे निकष बदलून टाकल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना पिकविम्याचा परतावा मिळणे अपेक्षित होते मात्र नुकसानीचे ट्रिगर बदलून टाकल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

पिकविमा निकषात तात्काळ आणि वस्तुनिष्ठ नुकसानीला आता भरपाई मिळणार नाही तर सरकारच्या सरासरी उत्पादनाच्या आधारावर ही भरपाई मिळणार आहे शिवाय त्यात एका कमिटीचा अहवाल देखील जोडला जाणार आहे त्यामुळे आता एखाद्या भागात अतिवृष्टी किंवा अवर्षण,गारपीट यासारखे प्रकार झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही.

पिक काढणी पूर्ण झाल्यानंतर सरकारी अहवालावर तसेच स्थापन केलेल्या कमिटीच्या अहवालावर नुकसान भरपाई मिळण्याचे प्रावधान केल्याने शेतकरी पिकविमा पासून वंचित राहिले आहे.

एकंदर ही सर्व प्रक्रिया विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांना फसवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केल्याची घनाघाती टीका प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

या पुढील काळात पीक विम्याचे निकष शेतकऱ्यांचे हिताचे न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सरकारचा निषेध केला जाईल.

पिक विमा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नसून फक्त विमा कंपनी ताजे करण्यासाठी असल्याने एकादेखील शेतकऱ्यांने हा फसवा पीकविमा काढू नये असे देखील आवाहन काँग्रेस नेते होळकर यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 7 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे