Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूर महाविद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न

1 1 8 3 0 7

न्यायभूमी 

विचूर दि.१२ ऑगस्ट मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर 

     सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे उच्च माध्यमिक विभागाचा ” शिक्षक पालक मेळावा ” संपन्न झाला. आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री वाबळे सर यांनी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .

     प्रथमता इयत्ता बारावी विज्ञानचा विद्यार्थी कुमार वेदांत जाधव याने ‘ विद्यार्थी – शिक्षक नाते ‘ कसे असावे यावर आपले मत व्यक्त केले. विज्ञान विभागाच्या वतीने श्री पाटील सर यांनी विज्ञान विभागा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सीईटी टेस्ट संदर्भात माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कॉलेजमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा बद्दल पालकांना माहिती सांगितली .

  संस्थेचे लाईफ वर्कर समन्वयक व पर्यवेक्षक ठाकरे सर यांनी इयत्ता अकरावी व बारावी नंतर अनेक नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना कशा संधी आहेत हे समजावून सांगितले . शिक्षक व पालकांनी मुलाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे असेही मत व्यक्त केले .

    रयत शिक्षण संस्थेचे श्री राजेंद्र चांदे सर (सदस्य मॅनेजिंग कौन्सिल ) यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास , तसेच मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.पालक प्रतिनिधी म्हणून श्री आबासाहेब दरेकर यांनी पालक म्हणून आपली जबाबदारी काय असते आणि पालकत्वाची व्यापक भूमिका समजावून सांगितली . 

    शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा . राजाभाऊ गोरे साहेब यांनी मुलांनी नेमके काय करावे आणि काय करू नये , तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी भविष्यात 15 टक्के विद्यार्थी यशस्वी होतात व शिल्लक राहिलेल्या 85% विद्यार्थी कोठे जातात याचाही पालक आणि शिक्षकांनी विचार करणे गरजेचे आहे असे भाष्य केले . शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री संदीप जोशी यांनी विद्यार्थी विकास चांगला आहे असे मत व्यक्त केले . 

    आजच्या पालक सभेचे आकर्षण ठरले ते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सोमनाथ निकम यांची कन्या आणि इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी पल्लवी सोमनाथ निकम हिचीटेनिस बॉल क्रिकेट मध्ये राष्ट्रीय स्तरावर झालेली निवड . कुमारी पल्लवी सोमनाथ निकम हिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघातून राष्ट्रीय स्तरावर झालेली निवड . ह्या तिच्या यशस्वी कारकीर्द निमित्त सर्व पालकांच्या व सर्व मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

    खेळ व अभ्यास यांची सांगड घालून विद्यार्थी कसा घडवावा याविषयी शिक्षक म्हणून आम्ही काय करतो हे अतिशय मोजक्या शब्दात ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री राजेंद्र टिळेकर यांनी स्पष्ट केले .

शिक्षक व पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थी विकास कसा साधता येईल व पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करून विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे आश्वासन विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदकुमार देवढे यांनी दिले.

पालक मेळाव्याचे अध्यक्ष मा . श्री जगदीश काका जेऊघाले यांनी शाळेच्या भरभक्कम पायाभरणीसाठी आणि विद्यार्थी विकासासाठी शिक्षकांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असे आश्वासन दिले .

         सदर मेळाव्यास शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री जगदीश काका जेऊघाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र गोरे , उपाध्यक्ष श्री सोमनाथ निकम , सदस्य श्री नानाभाऊ गाडे , श्री संदीप जोशी , गुरुकुल उपाध्यक्ष श्री दत्तात्रेय दरेकर ,श्री जेऊघाले सर , श्री धवन सर , श्री आबासाहेब दरेकर, श्री राजू क्षीरसागर , पत्रकार श्री दीपक घायाळ , सखी सावित्री समिती उपाध्यक्ष सौ मालती ताई जाधव , सौ सोनाली राऊत ,परिवहन समिती सदस्य श्री मंगेश सोनवणे ,सर्व पालक बंधू-भगिनी , महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नंदकुमार देवढे , रयत शिक्षण संस्थेचे श्री राजेंद्र चांदे (सदस्य मॅनेजिंग कौन्सिल ) ,उप मुख्याध्यापक श्री वाबळे सर , लाइफ वर्कर समन्वयक व पर्यवेक्षक श्री ठाकरे सर ,सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापिका सविता गायकवाड यांनी केले .

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे