Breaking
महाराष्ट्र

विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 7 5

न्यायभूमी 

नाशिक,दि.७ एप्रिल:- दत्तात्रय दरेकर 

 

Oplus_131072

गेल्या आठ दिवसापासून विंचूर लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकित वीजबिलामुळे बंद करण्यात आला होता.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत..

थकित वीजबिलामुळे गेल्या आठ दिवसांपासून विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश पवार व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या होत्या.

तसेच याबाबत संबंधित समिती व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहे.

त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक कार्यालयात पाणी पुरवठा समिती व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्णय झाला.त्यानंतर लगेचच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला असून आज पासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

यावेळी योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर,मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी हरीश भामरे,गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.थूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.महाजन,कार्यकारी अभियंता श्री. चिकोटे, उपअभियंता श्री.सूर्यवंशी,श्री.भावे, श्री.शिंदे,विंचूर सरपंच सचिन दरेकर,ग्रामविकास अधिकारी श्री.बाविस्कर,श्री.मगर,श्री.शिरसाठ, श्री.मराठे,पांडुरंग राऊत,पवन सानप,विलास गोरे,यश पटेल यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे