पुण्यात -प्राध्यापिका वर्षा मोतीराम कोल्हे/ (वर्षा अरुण जाधव),राष्ट्रीय भारत गौरव पुरस्काराने सन्मानित
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
नाशिक ( निफाड ) दि.११ ऑगस्ट
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निफाड तालुक्यातील खेडे(उगांव ), मातेरेवाडी. निफाड तालुक्यातील सुप्रसिद्ध व आदर्श व्यक्तिमत्व तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच कला,क्रीडा, शिक्षक ,पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या,निफाड पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सभासद, लेखिका, गायिका, नृत्यदिग्दर्शिका, आदर्श सूत्र संचालक, ऑल राऊंडर व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राध्यापिका वर्षा कोल्हे यांनादिनांक 9/08/2026 रविवार रोजी शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे येथे आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या सन्मानामुळे उगाव, खेडे,निफाड, मातेरेवाडी तसेच नाशिक जिल्ह्याच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साऊ ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, श्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र आणि एस. एच. मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे येथे राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विविध क्षेत्रातील लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा यावेळी राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. कर्तुत्वाला राष्ट्रीय सलाम – राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार हा केवळ सन्मानचिन्ह नसून समाजातील प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या संघर्षाला,समर्पणाला आणि सेवाभावाला मिळालेली दाद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले शिक्षण, साहित्य,कला,संस्कृती, क्रीडा, उद्योग, विज्ञान, कृषी,आरोग्य,पत्रकारिता, समाजकार्य,महिला सक्षमीकरण,युवक विकास,पर्यावरण अध्यात्म, आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
निफाड तालुक्यातील तसेच नाशिक जिल्यातील नातेवाईक मित्रपरिवार तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे अभिमानाची बाब असून हा पुरस्कार पुढील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी अधिक प्रेरणा देणारा ठरेल. अशी भावना प्राध्यापिका वर्षा कोल्हे यांनी व्यक्त केली.
सध्या बी.पी. पाटील संलग्नं वैनतेय जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय निफाड.तसेच महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय नाशिक येथे कार्यरतअसून या कार्यक्रमप्रसंगी प्रा वर्षां कोल्हे यांनी अतिशय सुंदर आवाजात देशभक्तीपर गीते गाऊन सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई, सोहळा अध्यक्ष प्रा. डॉ. शंकर अlदानी, सोहळा प्रमुख मार्गदर्शक : डॉक्टर मिलिंद स्वामी महाराज भोसुरे (कुशल ), बाळराजे वाळुंजकर (मराठी सिने अभिनेते ), चित्रा दीक्षित (बॉलिवूड सिने अभिनेत्री ), रुपाली पाटील /पांडे (मराठी सिने अभिनेत्री, नृत्यगना ), मा. पूजा माळी (मराठी सिने अभिनेत्री, नृत्यांगना )आदी मान्यवर उपस्थित होते.


