न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २५ में प्रतिनिधी सोमनाथ गिरी :-
सिन्नर शहरासह तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले असून आज मुसळधार पाऊस कोसळला आहे.
या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला बसला आहे.
तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. स्लॅबचा काही भाग शिवशाही बस वर तसेच एका खाजगी कारवर कोसळला.त्यामुळे शिवशाही बसचे नुकसान झाल्याचे समजते.

बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे.
पावसाचे पाणी साचल्याने शहरातील रस्ते काही काळासाठी बंद झाले असून वाहतूक ठप्प झाली होती.
पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पंरतु, हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही.

ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस बरसत असून, नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
सिन्नर शहरात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे सरस्वती आणि देव नदीला पूर आला आहे.