छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विंचूर दि.१९ फेब्रुवारी दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर हे होते. विद्यालयातील विद्यार्थी देवांग दरेकर,दुर्वा आहेर, प्रतीक भिडे,श्रद्धा जेऊघाले,संस्कृती आरगडे, वेदिका चव्हाण,श्रुतिका दरेकर,श्रुती जोंधळे, प्रियंका माळी, समृद्धी तीपायले, वैष्णवी बोरसे, जयेश जेऊघाले,आकाश हरदास व धनश्री जंगम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.
यावेळी विद्यार्थी अनिल देवासी यांनी शिवाजी महाराजांची तर साक्षी गुंजाळ यांनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारून उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यालयाचे उपशिक्षक पाडवी आर. टी. यांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांविषयी मार्गदर्शन केले.
उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी महाराजांचा इतिहास,त्यांची लोकोपयोगी कार्ये व रयतेप्रती असलेले कर्तव्यभाव विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी महाराजांच्या चारित्र्यसंपन्न,आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
सदर कार्यक्रम इयत्ता ८ वी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या आयोजित केला.
कार्यक्रमास राजेंद्र चांदे (लाईफ मेंबर,रयत शिक्षण संस्था,सातारा),विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदाम माळी,ग्रामस्थ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवांशी डवरे व आभार श्रुती पवार यांनी केले.


