नासिक जिल्हा रुग्णालयात धक्कादायक घटना सिव्हील हॉस्पिटल च्या नवजात शिशु विभागात आग
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज
नाशिक दि ०३ एप्रिल विशेष प्रतिनिधी रोशन गव्हाणे
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे.
नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच आहे मुळे आगीमुळे सर्वत्र धूर पसरला असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित खबरदारी म्हणून तातडीने नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे सर्व नवजात बाळक सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ज्या विभागात आग लागली त्या विभागात 69 नवजात बालक होते असल्याचे समजते.
सर्व बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे