Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरेत गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

Nyaybhumi news

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

 सिन्नर दि २१ एप्रिल प्रतिनिधी सोमनाथ गिरी:-

तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डुबेरे येशील सटूआई माता सभागृहामध्ये गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.

अशी माहिती मविप्र संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी दिली आहे.

       ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘या उदात्त भावनेने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त अभियान राबवण्यात येणार आहेत .

         शिबिरामध्ये रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येईल.आवश्यक रुग्णावर बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांचे भिंगारोपण( लेन्स) आडगाव नाशिक येथे करण्यात येईल.

नाशिक येथे जाण्याची व येण्याची मोफत सोय करण्यात आली असून मोफत औषध उपचार देखील करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी येताना आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे त्याशिवाय शस्त्रक्रिया होणार नाही .रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी च्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण व रुग्णासमवेत असणा-या एका व्यक्तीच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. तरी परिसरातील डुबेरे, डुबेरेवाडी, सोनारी ,आटकवडे, जयप्रकाश नगर, साबरवाडी या व परिसरातील इतर गावातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

 आव्हान संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, मविप्र संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक कृष्णाजी भगत,सर्व संचालक मंडळ,शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने,मुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक उल्हास पवार आदींसह शालेय समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे