Breaking
महाराष्ट्र

निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथील ३०० वर्ष पुरातन अहिल्यादेवी होळकर वाडा केला जमीन दोस्त

समाधान बागल व समिती यांनी निफाड तहसीलदार यांना निवेदन

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

 निफाड दि.२८ में अभय पाटील 

नांदुर मधमेश्वर (नाशिक) काही दिवसापूर्वीच सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने, समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधानजी बागल यांनी नांदूर मधमेश्वर होळकर वाडा बचाव यासाठी मोहीम चालवली होती.आणि ही मोहीम चालवत असताना शासनाच्या विविध स्तरांना पत्रव्यवहार करून त्यासंबंधी दाद मागण्यात आली होती.

त्या संबंधात कार्यवाही करून भूमि अभिलेख कलेक्टर ऑफिस पुरातत्व विभाग या सर्व स्तरावरून त्या ठिकाणी कारवाईच्या आदेश मिळावी यासाठी प्रयत्न चालू होते, आणि अशातच काही दिवस गेले असता नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी वाडा होता.

जो सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेस दिलेला होता‌. ती इंदोर सरकारची संपत्ती होती.

परंतु अहिल्यादेवी होळकर यांचा तो खाजगी वाडा असल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाच्या रूपाने खूप महत्त्व होते.

अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने सरकार प्रयत्न करत असतानाच आहिल्यादेवी होळकर यांचा पुरातन जुना वाडा पाडण्याचा घाट या ठिकाणी सरकारमार्फत घालण्यात आला.

या गोष्टीमुळे एक नाशिक जिल्ह्यातील इतिहासाचे खूप मोठे नुकसान झाले असून, अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी शासन दिखाऊ काम करत आहे.असे स्पष्ट मत समाजातून व्यक्त केले जात आहे.

हा होळकर वाडा पाडत असताना गावकऱ्यांनी होळकर वाडा पाडण्यास विरोध केला.

असता सरकारी कॉन्ट्रॅक्टर स्टे ऑर्डर आल्याशिवाय काम बंद करणार नाही. अशा स्वरूपाचे शब्द वापरून त्या ठिकाणी काम चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होता.

गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून काम बंद करण्यात यश मिळवले. परंतु सदर होळकर वाड्याची फक्त समोरील भिंत आता उभी आहे. आणि होळकर वाड्याच्या मागील तीनशे वर्ष जुन्या भिंती या नामशेष झालेल्या आहेत.

होळकर वाड्याच्या या तीनशे वर्ष जुन्या भिंती पाडल्याने तीनशे व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर असणारा आनंदाचे वातावरण एक अनोख्या शोकात बदलले आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाज ह्या कृत्याला कधीही माफ करणार नाही. पर्यटन मंत्रालयाला याचा जाब पूर्ण महाराष्ट्रातून विचारला जाईल.

महाराष्ट्राचा पर्यटन मंत्रालय पर्यटनाच्या नावाखाली समाजाच्या शक्ती खुणा, अस्तित्व खुणा आणि समाजासाठी शूरतेचे ,वीरतेचे पुरावे असणारे हे ऐतिहासिक वाडे नष्ट करतय, तेही अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० वी जयंती अगदी तीन-चार दिवसांवर आली असताना,यामुळे सरकारचे हेतूवर आता सर्व स्तरातून शंका घेतली जात आहे. आणि सरकारने याविषयी ठोस पावले उचलावे व पर्यटनमंत्र्यांनी प्रत्यक्ष याबाबत ठोस उत्तर द्यावे.

अन्यथा महाराष्ट्र भर साजरा होणाऱ्या जयंत्यांमध्ये एक काळा झेंडा लावून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल. आणि हा एक काळा झेंडा हा सरकारचा अहिल्यादेवी बद्दल कृतज्ञता नसून कृतघ्नता आहे. याचे प्रतीक मानले जाईल, असे समाज माध्यमांना समाधान बागल, नांदूर मध्यमेश्वर अहिल्यादेवी होळकर वाडा बचाव कृती समिती त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील धनगर समाज अहिल्यादेवी व इतिहास प्रेमी यांच्यावतीने सांगण्यात आले.

सदर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा स्वतःचा खाजगीचा वाडा होता आणि म्हणून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या पाऊलखुणा या वाड्याच्या रूपाने त्या ठिकाणी होत्या मातोश्रींनी कितीतरी श्रावणमास त्या ठिकाणी काढलेले होते.

त्याचप्रमाणे इंदोर नंतर आपल्या लेकीच्या सासरच्या गावाजवळ म्हणजेच निफाडच्या जवळ असलेला हा सर्वात जवळचा अहिल्यादेवी यांचा वाडा असल्याने या होळकर वाड्याचं विशेष महत्त्व हे अहिल्यादेवींचे आपल्या लेकीशी असलेल्या नात्यामुळे आहे आणि त्यामुळे मातोश्रींचा हा अतिशय जवळची व जिव्हाळ्याची वास्तू असल्याने ह्या वास्तूवर अशाप्रकारे घाला घालण्यात आला.

हा अतिशय निंदासपत प्रकार असल्याचे समाजातील विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे.
अशा प्रकारे या शक्तीस्थळांची मोडतोड करुन आमच्या आदर्शांच्या पाऊलखुणा पुसणार्यांना समाज कधीही माफ करणार नाही.

सरकारने लवकरात लवकर ह्या समाज कंटकांवर कारवाई करावी.

अन्यथा समाजाच्या व अहिल्या प्रेमींच्या रोषाला सामोरे जाऊ असे निवेदन समाधान बागल व समिती यांनी निफाड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे